चुकूनही या ठिकाणी जाण्याची हिंमत करू नका, भारतातील ती जागा जिथे सरकारही जायला घाबरतं
नॉर्थ सेंटिनेल बेटावर एक भयानक जमात वास्तव करते जिला सेंटिनेल असे म्हटले जाते. सेंटिनेल जमात प्राचीन काळापासून इथे राहत आहे आणि त्यांचा इतिहास 50,000 वर्षांपूर्वीचा आहे.
शहरापासून दूर हे ठिकाण बाहेरील जगापासून एकदम वेगळे आहे. इथली जमत बेटावर बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश करू देत नाही.
जेव्हाही बाहेरील जगातील लोक त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात ते धनुष्यबाणांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला करतात. हे लोक अधिकतर माशांची शिकार करून त्यावर उदरनिर्वाह करतात.
या बेटावर कुणीही जाऊ नये म्हणून भारतीय सरकारने 1956 मध्ये बेटाच्या 5 किलोमीटरच्या परिसरावर बंदी घातली आहे.
इथे आजवर जो कोणी गेला आहे तो मृत्यूला बळी पडला आहे. सेंटिनेल जमात इथे येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाला वाईटरित्या मारून टाकते.