जगन्नाथ मंदिर, ओडीशा : आठव्या शतकात 'आदि शंकाराचार्यां'नी पुरी येथे जगन्नाथ मंदिराची स्थापना केली. 'जगन्नाथ' हा 'विष्णू'चा अवतार मानला जातो. या मंदिरात अनेक रहस्य आहेत. असं म्हटलं जातं की, या मंदिरात जगन्नाथाचं हृदय आहे.
श्री नाथजी मंदिर , राजस्थान: काळ्या कातळातील ही मूर्ती गोवर्धनधारी कृष्णाचा अवतार आहे. या मंदिराची स्थापना 17 व्या शतकात झाल्याची सांगितलं जातं.भगवान विष्णू हे राजस्थानमध्ये 'श्री नाथजी' या अवतारात प्रकट झाले होते.
लक्ष्मीरामन स्वामी मंदिर, म्हैसूर: हातात चक्र व शंख घेऊन उभी असेली ही मूर्ती सुमारे 4 फूट उंच आहे .हे मंदिर म्हैसूरमधील प्राचीन वैष्णव स्थानांपैकी पहिलं मानलं जातं .स्थापत्य, ऐतिहासिक-महाभारतीकथा आणि वाडेयर राज्याशी घट्ट संबंध असल्य़ाच्या खुणा येथील स्थापत्यशैलीत दिसून येतात. श्री लक्ष्मीरामन स्वामी मंदिर हे म्हैसूरच्या वैभवशाली इतिहासातील वारसा आहे.
रंगनाथस्वामी मंदिर , तामिळनाडू: भगवान विष्णूच्या रंगनाथ (शेषशयी) स्वरूपाला समर्पित या मंदिराची स्थापना केली गेली. . हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात मोठे आणि पवित्र वैष्णव मंदिर मानले जाते. हे मंदिर वससेलं आहे.
विठ्ठला मंदिर, हंपी: विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण हंपी शहरातील विठ्ठला मंदिर. या मंदिराच्या स्थापत्यशैलीला "कर्नाटकमधील वास्तुकलेचा मुकुटमणी" असेही म्हटले जाते.हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
लक्ष्मीरामन स्वामी मंदिर, म्हैसूर: हातात चक्र व शंख घेऊन उभी असेली ही मूर्ती सुमारे 4 फूट उंच आहे .हे मंदिर म्हैसूरमधील प्राचीन वैष्णव स्थानांपैकी पहिलं मानलं जातं .स्थापत्य, ऐतिहासिक-महाभारतीकथा आणि वाडेयर राज्याशी घट्ट संबंध असल्य़ाच्या खुणा येथील स्थापत्यशैलीत दिसून येतात. श्री लक्ष्मीरामन स्वामी मंदिर हे म्हैसूरच्या वैभवशाली इतिहासातील वारसा आहे.
द्वारकाधीश, गुजरात : भक्तीमय वातावरण आणि निसर्गसौंदर्य यांचा संगम म्हणजे गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर. असं म्हणतात की, 2200 वर्षांपुर्वीचं हे प्रचीन मंदिर आहे. श्रीकृष्णाच्या नातवाने या मंदिराची स्थापना केली असल्याचं म्हटलं जातं.