फोटो सौजन्य - oneplus
Nord 4 मध्ये 50MP Sony LYTIA+ 8MP कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी यात 16MP सेन्सर आहे. हा फोन 3 कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 8GB रॅम/128 GB ची किंत 29,999 रुपये आहे. तर 8GB रॅम/256GB ची किंमत 32,999 रुपये आहे. तसेच 12GB रॅम/256GB ची किंमत 35,999 रुपये आहे.
कंपनीने फ्लॅट डिझाईन केलेल्या वर्टिकल कॅमेरा मॉड्यूलसह Nord 4 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन मर्क्युरियल सिल्व्हर, ऑब्सिडियन मिडनाईट आणि ओएसिस ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये मिळू शकते. फोनला IP65 रेटिंग मिळाली आहे.
OnePlus Nord 4 मध्ये अल्ट्रा HDR सपोर्टसह 6.74-इंचाचा सुपर फ्लुइड AMOLED LTPS डिस्प्ले आहे. यात 120 Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट, 2150 nits पीक ब्राइटनेस आणि पंच-होल डिझाइन आहे. OnePlus Nord 4 मध्ये Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 SoC आहे. Nord 4 मधील बॅटरी 5,500 mAh पूर्वीपेक्षा मोठी आहे, जी 100W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.
OnePlus Nord 3 मध्ये मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा युनिट आहे. यात 50MP+8MP+2MP सेटअप आहे. तर सेल्फीसाठी फक्त 16MP कॅमेरा दिला आहे. OnePlus Nord 3 हा फोन 2 कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. 8GB+128GB स्टोरेज ची किंमत 33,999 रुपये आहे. तर 16GB+256GB स्टोरेजची किंमत 37,999 रुपये आहे.
OnePlus Nord 3 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1450 nits पीक ब्राइटनेस आणि पंच-होल डिझाइनसह 6.74-इंच फ्लुइड AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus Nord 3 ची रचना यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. स्मार्टफोन क्षैतिज कॅमेरा मॉड्यूलसह येतो. हे मिस्टी ग्रीन आणि टेम्पेस्ट ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याला IP54 रेटिंग मिळाले आहे.
OnePlus Nord 3 मध्ये MediaTek Dimensity 9000 SoC आहे, जे 4nm वर कार्य करते. हे Mali-G710 MC10 GPU सह जोडलेले आहे. 16GB पर्यंत RAM आणि UFS 3.1 स्टोरेज 256GB पर्यंत आहे. Nord 3 मध्ये 80w चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000 mAH बॅटरी आहे.