Pankaj Tripathi Success Story: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
पोटासाठी हॉटेलमध्ये कांदा-बटाटे सोलले- शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पटनाला गेले, तिथे त्यांनी महाविद्यालयीन राजकारण आणि नाटकांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली.पटण्याला गेल्यावर पोटाचा प्रश्न होताच. म्हणून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. आणि पाटण्यातल्या हॉटेल मौर्यमध्ये दोन वर्षं कुक म्हणून काम केलं. एका मुलाखतीत त्याने स्वतः सांगितलं होतं, हॉटेलमध्ये असताना त्याच्याकडे कांदे आणि बटाटे सोलायचं काम होतं. दिवसभर कांदा सोलायचा, बटाटे सोलायचे. हात दुखायचे, डोळे पाणवायचे. पण त्याने कधी हार मानली नाही. मनात एकच होतं, एक दिवस काहीतरी मोठं करायचं.
'त्या' एका चित्रपटाने आयुष्य बदललं- २०१२ साली अनुराग कश्यप दिग्दर्शित 'गैंग्स ऑफ वासेपूर' त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटातील 'सुलतान कुरेशी' या भूमिकेने त्यांना खरी ओळख आणि समीक्षकांची दाद मिळवून दिली.2012 पर्यंत पंकजला कोणीच ओळखत नव्हतं. छोटी-मोठी कामं करत होता. पण 'गँग्स ऑफ वासेपूर' आला आणि सगळं बदललं. त्यात त्याने सुलतान कुरेशीची भूमिका केली. छोटी भूमिका होती, पण लोकांच्या डोक्यात बसली. समीक्षकांनी पण त्याचं कौतुक केलं. तिथून त्याचा खरा प्रवास सुरू झाला. लोकांना कळलं, हा बिहारचा पोरगा काहीतरी वेगळं आहे.
कालीन भैय्या बनला आणि घराघरात पोहोचला- मिर्झापूर या वेबसिरीज मधील 'कालीन भैया' या पात्राने त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली.मिर्झापूर आली आणि पंकज त्रिपाठी घराघरात पोहोचला. कालीन भैय्या म्हणजे असा माणूस, जो शांत असतो पण त्याची दहशत असते. त्याने ती भूमिका इतकी भारी केली की लोक त्याला खऱ्या नावाने कमी, कालीन भैय्या म्हणून जास्त ओळखायला लागले. त्यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही. 'न्यूटन', 'बरेली की बर्फी', 'गुंजन सक्सेना', 'लुडो', '83', 'ओएमजी 2' आणि 'मैं अटल हूँ' अशा सगळ्या चित्रपटात त्याने वेगवेगळ्या भूमिका केल्या. प्रत्येक वेळी तो वेगळा वाटला.
राष्ट्रीय पुरस्कार मिळवला, तरी साधेपणा सोडला नाही- मिमीमधील 'भानू प्रताप पांडे' या टॅक्सी चालकाच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.'मिमी' मध्ये त्याने टॅक्सी ड्रायव्हर भानू प्रताप पांडेची भूमिका केली. ती भूमिका लोकांच्या काळजाला भिडली. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. फिल्मफेअर पण मिळालं. आणि 'स्त्री 2' तर त्याच्या कारकिर्दीतला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. एवढं मोठं यश मिळून पण तो माणूस आजही जमिनीवर आहे. गावाकडचा साधेपणा त्याने सोडलेला नाही.
कुटुंब आणि साधी माणसं- पंकज त्रिपाठी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी मृदुला यांच्याशी २००४ मध्ये विवाह केला. त्यांना आशी ही मुलगी आहे.2004 मध्ये त्याने मृदुला हिच्याशी लग्न केलं. त्यांना आशी नावाची मुलगी आहे. यशाच्या शिखरावर पोहोचूनही त्याचा साधेपणा कायम आहे. तो आजही तसाच बोलतो, तसाच वागतो. म्हणूनच लोक त्याला 'हुकमी एक्का' म्हणतात. बिहारच्या एका गावातून निघालेला, हॉटेलमध्ये कांदा-बटाटे सोलणारा पोरगा आज बॉलिवूडवर राज्य करतोय, हीच त्याची खरी कहाणी आहे.