Pratik Gandhi Sherwani Look
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा प्रतीक गांधी सध्या त्याच्या फॅशनमुळे चर्चेत आला आहे. प्रतीकने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. काही तासांपूर्वी अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक स्टायलिश फोटोशूट शेअर केले आहे.
अभिनेत्याने डार्क ब्लू कलरचा स्टायलिश कुर्ता आणि पायजमा घालून कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले आहे. त्याच्या फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधले असून त्याच्या लूकचे नेटकरी कौतुक करीत आहेत.
कुर्ता आणि पायजमा वेअर करत कॅमेऱ्यासमोर अभिनेत्याने जबरदस्त फोटोशूट केले आहे. त्याने कॅमेऱ्यासमोर दिलेल्या फोटो पोजेसची चांगलीच चर्चा होत आहे.
कायमच वेगवेगळ्या अंदाजात फॅशन करणाऱ्या प्रतीकच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत आहेत. त्याच्या लूकवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
प्रतीक गांधीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.