रकुलने शेअर केले तिचे नवे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्या @rakulpreet या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटोज शेअर केले आहेत. 'अदा असावी तर अशी...' तिचे फोटोज पाहून हे शब्द आपसूक ओठांवर येतात.
जांभळ्या रंगाचा वेस्टर्न आउटफिट, गळ्यात नेकलेस आणि चेहऱ्यावर चमक असे या संपूर्ण लुकचे वर्णन आहे. आकर्षित करण्यासाठी तिची नजरच पुरेशी आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिने तिच्या संपूर्ण लूकबद्दल तसेच या फोटोशूटबद्दल माहिती पुरवली आहे.
तिच्या सौंदर्याची जादू नेटकऱ्यांवर झालेली दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
तसेच रकुलच्या आगामी चित्रपट तसेच वेब सिरीज विषयी अनेक प्रश्न चाहत्यांनी कॉमेंट्स केले आहेत. चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल उत्सुकता लागून आहे.