हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या ‘नवरोबा’ची वाट, ‘कन्नी’ मधील रॅप साँग प्रदर्शित!
'कन्नी' चित्रपटातील 'नवरोबा' हे रॅप साँग रिलीज झाले आहे. ज्योती भांडे आणि सीज़र यांनी या गाण्याला आवाज दिला असून चैतन्य कुलकर्णी यांचे कमाल बोल या गाण्याला लाभले आहेत. तर एग्नेल रोमन यांनी जबरदस्त संगीत दिले आहे. गाण्यात हृतासोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहरही दिसत आहेत. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.