साहिल आणि मिलेना यांनी लग्नगाठ बांधली आहे. (फोटो सौजन्य - Social Media)
साहिल खान आणि मिलेना यांनी लग्न केले आहे. त्यांची लव्हस्टोरी तर सोशल मीडियावर प्रत्येकाला परिचित होती. अखेर भारताला तिची फॉरेनची सुनबाई मिळाली आहे.
विशेष बाब म्हणजे साहिल खान याची पत्नी केवळ २२ वर्षांची आहे. त्याच्या लग्नाचे फोटोज इंस्टाग्रामवर फार व्हायरल होत आहेत.
साहिल खान आणि मिलेनावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे भरभरून आभिनंदन केले आहे.
चर्चेत असणाऱ्या गोड क्षणांमध्ये साहिल खान काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तर मिलेना श्वेत रंगाचा Bridal Gown परिधान केला आहे.
बुर्ज खलिफामध्ये या खास क्षणांचे ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आले आहे. मिलेना साहिलपेक्षा २६ वर्षांनी वयाने लहान आहे.