राघव-परिणितीच्या घरी शंकराचार्यांनी दिली भेट. (फोटो सौजन्य- Social Media)
नुकतेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राजकीय नेते राघव चड्ढा यांचे लग्न झाले आहे. त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्याच्या घरी जोशीमठाचे परमपूज्य शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आले होते.
अभिनेत्री परिणीती चोप्राने तसेच तिचा पती राघवने मिळून आजची पूजा संपन्न केली आहे. कुटुंबासहित त्यांनी शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे स्वागत केले आहे.
शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यासह जोशीमठातील अनेक साधूगण परिणीती-राघवच्या घरी त्यांची भेट घेण्यास आले होते.
राघव आणि परिणीतीने या पूजेचे फोटोज त्यांच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केले आहेत. राघवने या क्षणासाठी देवाचे आभार मानले आहेत.
शेअर केलेल्या फोटोजमध्ये सगळीजण पूजेमध्ये तल्लीन झाली आहेत. नवं जोडपे कुटुंबासह शंकराचार्यांचे आशीर्वाद घेत आहेत.