शर्वरी वाघने शेअर केले आपले डॅशिंग फोटो (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेत्री शर्वरीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि फ्लॅरेड पँट परिधान केली आहे. या लुकमध्ये अभिनेत्री एकदम डॅशिंग आणि आकर्षित दिसत आहे.
शर्वरीने या काळ्या रंगाच्या पोशाखात काळ्या रंगाचे ब्लेजर देखील परिधान केले आहे. या ब्लेजरवर चमकते नक्षी काम आहे ज्यामुळे तिला ते खूप शोभून दिसत आहे. आणि या सगळ्यामुळे तिचा एक लेडी बॉस लुक पूर्ण होत आहे.
शर्वरीने या काळ्या रंगाच्या ड्रेसवर भरीव आणि आकर्षित मेकअपची निवड केली आहे. तिने जाड काजळ, मस्कारा, डार्क आयमेकअप आणि न्यूड लिपस्टिक या सगळ्या सामग्रीचा वापर करून अभिनेत्रीने आपला लुक परिपूर्ण केला आहे.
मेकअप आणि पोशाखासह शर्वरीने सिल्वर दागिने देखील परिधान केले आहे. तिने कानात डायमंन इरिंग, गळ्यात सिल्वर नेकलेस आणि हातात डायमंन आंगठ्या घातल्या आहेत.
शर्वरीचा हा आकर्षित आणि मोहक लुक पाहून चाहते पुन्हा घायाळ झाले आहेत. आणि तिच्या पोस्टवर भरभरून प्रतिसाद देत आहेत.