लग्नसमारंभात स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घालताय? मग फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
स्लीव्ह्जलेस ब्लाऊजमध्ये अनेक वेगवेगळे पॅर्टन बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे साडीच्या रंगानुसार आणि साडीच्या फॅब्रिकवर ब्लाऊज पसंत करावा. यामुळे चारचौघांमध्ये तुम्ही अतिशय सुंदर दिसाल.
स्लीव्ह्जलेस ब्लाऊज परिधान करण्याआधी त्यांची फिटिंग व्यवस्थित चेक करून घ्यावी. अन्यथा ब्लाऊज परिधान करू नये. याशिवाय ब्लाऊजचे कप आणि बटन व्यवस्थित चेक करून पाहावे.
ग्लॅमरस लूकसाठी तुम्ही डीप व्ही नेक किंवा स्वीटहार्ट नेकलाइन्स असलेले ब्लाऊज तुम्ही परिधान करू शकता. पार्टी आणि कॉकटेल पार्टीसाठी हॉल्टर नेक किंवा स्ट्रॅपी ब्लाउज सुंदर दिसतील.
बॅकलेस किंवा टाय-अप डिझाइन्स असलेले ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदर लुक देतात. हे ब्लाऊज परिधान केल्यास तुम्ही बोल्ड आणि क्लासी लुक मिळेल.
स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यास स्टिक ऑन ब्रा चा वापर करावा. या ब्रा स्लीव्ह्जलेस ब्लाऊजमध्ये अतिशय आरामदायी आणि कम्फरटेबल असतात. ब्लाऊज निवडताना तुम्ही भरतकाम, स्टोन किंवा मखमली ब्लॉउजची निवड करावी.