अंजीर हे आरोग्यासाठी उत्तम असून नियमित खावे असा सल्ला डाएटिशियन देतात. मात्र याचा योग्य प्रमाणात वापर करून घ्यावा
अंजीरमध्ये असलेले फायबर पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून बचाव करते
अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो
अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि कर्करोगाचा धोका कमी करतात
अंजीरमध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते
अंजीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते आणि तुमच्या शरीरातील हाडांना अधिक बळकट बनवते
एका दिवसात किती अंजीर खावेत? असा जर प्रश्न असेल तर तुम्ही दररोज 3-4 सुके वा भिजवलेले अंजीर किंवा 2-3 ताजे अंजीर खाऊ शकता