Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून…

घरभाडे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन घरखर्च भागवताना कर्मचाऱ्यांना उधारी-उसनवारी करावी लागत आहे. दर दोन-तीन महिन्यांनी वेतन रखडते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 24, 2026 | 03:08 PM
आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून...

आरोग्य अभियान कर्मचारी अद्यापही वेतनापासून दूरच; मागील तीन महिन्यांपासून...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या 40 हजारांहून अधिक कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांचे वेतन व मानधनाची देयके काही महिन्यांपासून रखडले आहेत. अनुदान उपलब्ध नसल्यामुळे जानेवारी महिन्याचे वेतन प्रलंबित असून, वारंवार होणाऱ्या विलंबामुळे शेवटच्या घटकापर्यंत सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घरभाडे, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन घरखर्च भागवताना कर्मचाऱ्यांना उधारी-उसनवारी करावी लागत आहे. दर दोन-तीन महिन्यांनी वेतन रखडते. किती वेळा आणि कोणाकडून उधार घ्यायचे? असा सवाल कर्मचारी उपस्थित करत आहेत. एकूणच, बहुतांश जिल्ह्यांत डिसेंबरपर्यंतची देयके अदा झाली असली तरी जानेवारी महिन्यासाठी अनुदान उपलब्ध नसल्यामुळे वेतन, मानधन व प्रोत्साहन भत्ते प्रलंबित आहेत.

पुणे जिल्ह्यात डिसेंबर २०२५ पर्यंत वेतन अदा झाले असले, तरी जानेवारी २०२६ साठी अनुदान उपलब्ध नसल्याने वेतन प्रलंबित आहे. आशा स्वयंसेविकांचे मानधन नोव्हेंबरपर्यंत देण्यात आले असून, डिसेंबर व जानेवारी महिन्यांची देयके थकीत आहेत. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन भत्ते ऑक्टोबरपर्यंत अदा झाले असून, नोव्हेंबर व डिसेंबरचे प्रस्ताव तयार असले तरी निधी अभावी देयके अदा झालेली नाहीत. एचबीटी व १५ व्या वित्त आयोगांतर्गत डिसेंबरपर्यंतची देयके पूर्ण झाली असून, जानेवारीचे प्रस्ताव सहीसाठी प्रलंबित आहेत.

हेदेखील वाचा : Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मागील तीन महिन्यांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही.त्यामुळे ४२ हजार कर्मचाऱ्यांकडे दैनंदिन जीवण जगण्यासाठी देखील पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

– हर्षल रणवरे, राज्य समन्वयक, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी संघटना.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचा संताप कायम 

दुसरीकडे, गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाणे शहर ठप्प झालं होतं. मात्र, आता पाऊस थांबला असला तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संताप अजूनही तेवढाच आहे. या रोषात देखील माणुसकीचं दर्शन दिसले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णांसाठी अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केलं यातून हेच समोर आलं की, संघर्ष फक्त हक्कांसाठी नाही, तर कर्तव्य निभावण्यासाठीही असतो.

हेदेखील वाचा : Pawan Hans Helicopter: अवघ्या काही क्षणात होत्याच नव्हत झालं! ७ जणांना घेऊन जाणारे पवन हंस हेलिकॉप्टर

Web Title: Health campaign workers still far from getting their salaries

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Health News
  • pune news

संबंधित बातम्या

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी
1

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
2

Ashadhi Wari Palkhi 2026: देहू-आळंदी पालखी मार्गावरील कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी
3

वारजे महामार्ग चौक ते मुठा नदीपर्यंत डीपी सर्विस रस्ता काळाची गरज; नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी

येरवड्यात मोकळ्या जागी असलेल्या वाहनांना भीषण आग; 50 गाड्या जळून खाक
4

येरवड्यात मोकळ्या जागी असलेल्या वाहनांना भीषण आग; 50 गाड्या जळून खाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.