नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडपासून ते दक्षिण भारतीय सेलिब्रिटींपर्यंत, सर्वांनी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनीही दिवाळी साजरी केली. लग्नानंतर या जोडप्याची ही पहिलीच दिवाळी होती आणि त्यांनी एक फोटोशूटही केले.
दिवाळीसाठी, शोभिताने सोनेरी नक्षीकाम असलेला जांभळा मखमली सूट घातला होता. या सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने ड्रेसशी मॅचिंग असे कानातले घातले होते आणि तिने मेकअप देखील साधा केला होता. शोभिता या ड्रेसवर बन हेअरस्टाईल घातली होती. फोटोंमध्ये ती तिच्या हेअरस्टाईलला फ्लॉन्ट करतानाही दिसली.
शोभिता आणि नागा चैतन्य यांनी अनेक फोटोंमध्ये एकत्र पोज दिली आहे. एका फोटोमध्ये, अभिनेता तिच्याकडे प्रेमाने पाहत असल्याचे दिसत आहे.
दुसऱ्या फोटोमध्ये नागा आणि शोभिता एकमेकांचे हात धरलेले दिसत होते. शोभिताने पेटलेल्या दिव्यांचाही फोटो शेअर केला आहे.