प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात 'या' साऊथ इंडियन साड्या
साउथ इंडियन साड्या समृद्ध वारशासाठी, उत्कृष्ट विणकामासाठी आणि मोहक लुकसाठी जगभरात फेमस आहे. कांजीरावां सिल्क साडी दक्षिण भारतीय साड्यांची राणी म्हणून ओळखली जाते. ही साडी शुद्ध रेशमाच्या धाग्यांचा वापर करून बनवली जाते.
ओणम किंवा लग्न समारंभात कसावू साडी नेसली जाते. पांढऱ्या रंगाच्या उठावदार साडीवर सोनेरी जरीचे विणकाम केले जाते. कसावू साडीवर तुम्ही कोणत्याही रंगाचे ब्लाऊज घालू शकता.
पोचमपल्ली साडी शुद्ध धाग्यांचे विणकाम करून तयार केली जाते. ही साडी तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. साडीच्या काठाला आणि वरच्या भागात सेम डिझाईन केली जाते.
म्हैसूर सिल्क साडी वजनाने अतिशय हलकी असते. ही साडी बनवण्यासाठी प्युअर सोन्याची जर वापरली जाते. कोणत्याही लग्न सोहळ्यात किंवा पार्टीमध्ये तुम्ही म्हैसूर सिल्क साडी नेसू शकता.
कॉटन आणि सिल्क साडीचे सुंदर मिश्रण तयार करून गडवाल साडी बनवली जाते. ही साडी नेसायला अतिशय सोपी आणि हलकी आहे.