लग्नाच्या विचित्र परंपरा! कुठे वधू-वरावर फेकतात टोमॅटो तर कुठे फोडावी लागतात भांडी... वाचून तुम्हीही व्हाल थक्क
जगातील विविध देशांमध्ये लग्नाशी संबंधित अनेक परंपरा आणि विधी आहेत. प्रत्येक प्रथेचे स्वतःचे महत्त्व आहे. आता आम्ही तुम्हाला काही विचित्र परंपरांबद्दल सांगणार आहोत.
उत्तर प्रदेशातील सारसौल शहरात लग्नामध्ये एक अनोखी परंपरा पाळली जाते. इथे वराच्या कुटुंबाचे स्वागत टोमॅटो टाकून केले जाते.
जर्मनीमध्ये लग्नानंतर वधू-वरांनी लाकूड तोडण्याची परंपरा आहे. या विधीमध्ये, नवविवाहित जोडपे एकत्रितपणे लाकडाचे दोन भाग करतात.
जर्मनीत वधू-वर आणि पाहुणे एकत्रितपणे चीनी-मातीची भांडी फोडतात.
व्हेनेझुएलामध्ये, लग्नानंतर वधू आणि वर शांतपणे आणि निरोप न घेता समारंभातून निघून जातात. असे केल्याने त्यांच्या वैवाहिक जीवनात नशीब आणि समृद्धी येते असे मानले जाते.
स्कॉटलंडमध्ये वधू-वरांवर काळी शाई, अंडी, कुजलेले अन्न, पीठ आणि कचरा यासारख्या वस्तू फेकल्या जातात. याला "ब्लॅकनिंग" म्हणतात.