ऑफिसला जाण्याची घाई, मुलांना शाळेत पोहोचवण्याचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढलेला तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराकडे खूप जास्त दुर्लक्ष होते. घाईमुळे सकाळचा नाश्ता करायला वेळ मिळत नाही. पण असे केल्यामुळे शरीराचे गंभीर नुकसान होते. सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभराच्या ऊर्जेसाठी आवश्यक असलेले प्रोटीन मिळत नाही. यामुळे शरीरात सतत थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यात प्रोटीन युक्त कोणत्या पदार्थांचा नाश्त्यात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात कधीच निर्माण होणार नाही प्रोटीनची कमतरता! तेल मसाल्यांचा वापर न करता बनवा 'हे' आरोग्यदायी नाश्त्यातील पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात ओट्सचा समावेश करावा. ओट्स खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. ओट्स बनवल्यानंतर त्यासोबत तुम्ही वेगवेगळी फळे मिक्स करून सुद्धा खाऊ शकता.

मोड आलेल्या कढधान्यांपासून भाजी बनवून खाण्यापेक्षा सॅलड बनवावे. सॅलड खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि शरीर हेल्दी राहण्यास मदत होते.

शाकाहारी लोकांसाठी पनीर प्रथिनांचा आवश्यक स्रोत आहे. त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात वेगवेगळ्या भाज्या आणि पनीर एकत्र मिक्स करून सॅलड बनवून खावे.

दैनंदिन आहारात नियमित फळांचा समावेश करावा. पेरू, सफरचंद, केळी, पपई इत्यादी फळांचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होईल.

सकाळच्या घाईमध्ये नाश्ता करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी दूध, केळी, खजूर इत्यादी पदार्थांचा वापर करून स्मूदी बनवावी. स्मूदी प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते.






