जगातील 'या' देशांमध्ये रात्र होतच नाही; इथे सुमारे सूर्य 70 दिवसांपेक्षा जास्त काळ दिवसच असतो ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नॉर्वे - आर्क्टिक सर्कलमध्ये वसलेला हा देश मध्यरात्री सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो. मे ते जुलै अखेरपर्यंत येथे सूर्य मावळत नाही. याचा अर्थ असा की सूर्य 76 दिवसांच्या कालावधीत मावळत नाही. नॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 10 एप्रिल ते 23 ऑगस्टपर्यंत सूर्य आकाशात चमकताना दिसतो.
नुनावुत (कॅनडा) - हे ठिकाण आर्क्टिक सर्कलपासून 2 अंश वर आहे आणि कॅनडाच्या उत्तर-पश्चिम भागात आहे. या ठिकाणी दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस, दोन महिने सूर्य दिसतो. तर हिवाळ्यात 30 दिवस अंधार असतो.
आइसलँड - ग्रेट ब्रिटन नंतर आइसलँड हे युरोपमधील सर्वात मोठे बेट आहे. या देशात डासही आढळत नाहीत. या देशात जून महिन्यात सूर्य मावळत नाही.
बॅरो, अलास्का - या देशात मे अखेर ते जुलै अखेरपर्यंत सूर्य मावळत नाही. यानंतर, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पुढील 30 दिवस येथे सूर्य उगवत नाही. त्याला ध्रुवीय रात्र म्हणतात. याचा अर्थ हा देश हिवाळ्यात पूर्ण अंधारात जातो.
फिनलंड - येथे तुम्हाला हजारो बेटे आणि तलाव सापडतील. फिनलंडमध्ये उन्हाळ्याच्या हंगामात सलग ७३ दिवस सूर्य आकाशात तळपताना दिसतो. तर हिवाळ्यात सूर्यास्त होतो.
स्वीडन- स्वीडनमध्ये मेच्या सुरुवातीपासून ते ऑगस्टच्या अखेरीस सूर्य मध्यरात्री मावळतो आणि पहाटे ४ वाजता पुन्हा उगवतो. या देशात सूर्य सतत ६ महिने उगवतो.