डोमिनिका: येथे तुम्ही किमान ७६ लाख रुपयात नागरिकत्व मिळवू शकता. तुम्हाला फक्त ३ ते ६ महिन्यांत नागरिकत्व मिळेल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. तुम्ही घर घेतले नाही तरीही तुम्हाला नागरिकत्व मिळेल. येथे कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही आणि भाषेचा कोणताही अडथळा नाही. त्यानंतर तुम्ही १४५ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकता.
सेंट लूसिया: येथे देखील किमान गुंतवणूक ₹७६ लाख आहे. त्यानंतर गोल्डन व्हिसासाठी ४ ते ५ महिने प्रक्रिया वेळ लागेल. येथे नागरिकत्वासाठी कोणताही जागतिक कर भरण्याची आवश्यकता नाही.
वानुआतुः येथील नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्हाला किमान ८० लाख रुपये गुंतवावे लागतील. ६० दिवसांच्या आत तुम्हाला नागरिकत्व दिले जाईल.
ग्रेनाडा: येथे राहण्यासाठी तुम्हाला किमान १९५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यूएस ई-२ व्हिसा कराराची सुविधा असलेला हा एकमेव देश आहे. यामुळे तुम्हाला अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळते.
अँटिग्वा आणि बारबुडा: या देशाचा गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी तुम्हाला किमान ₹७६ लाखांची गुंतवणूक करावी लागेल.
उत्तर मॅसेडोनियाः या देशाचे नागरिक होण्यासाठी तुम्हाला किमान ९२ लाख रुपये गुंतवावे लागतील. हे युरोपच्या बाल्कन प्रदेशाचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.
मोल्दोव्हा: या देशाच्या गोल्डन व्हिसासाठी किमान ९२ लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर १२० हून अधिक देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी आहे.
सेंट किट्स आणि नेव्हिस: या देशाचे नागरिकत्व मिळविण्यासाठी तुम्ही किमान ९२ लाख रुपये गुंतवू शकता.