सफरचंदपासून बनवले जाणारे जगभरात प्रसिद्ध असलेले पदार्थ
अँपल क्रिस्प बनवण्यासाठी सफरचंदाचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर त्यावर ओट्स, दही आणि ब्राउन शुगरचा थर लावून हे सर्व मिश्रण बेक केले जाते.
अँपल टारटे टॅटिन ही फ्रांसमधील प्रसिद्ध रेसिपी असून हा पदार्थ खाण्यासाठी अनेक लोक फ्रान्समध्ये जातात. पेस्ट्री पिठापासून हा पदार्थ बनवला जातो. तसेच याच्यासाठी सफचंद कॅरमलाज केले जाते.
अँपल सॉस भारतासह इतर सर्व देशांमध्ये बनवला जातो. अँपल सॉस तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता. सॉस बनवण्यासाठी काळीमिरी पावडर आणि चिली फ्लेक्स वापरले जाते.
अँपल पाई ही एक अमेरिकन रेसिपी आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी सफरचंदाची पेस्ट करून फिलिंग तयार केली जाते. हे मिश्रण बनवण्यासाठी दालचीनी, जायफळ आणि साखर इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. तसेच हा एक गोड पदार्थ असून आईस्क्रीम सोबत खाल्ला जातो.
अँपल स्ट्रूडेल ही ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध रेसिपी असून हा पदार्थ बनवताना मैद्याच्या रोलमध्ये सफरचंदाचे स्टफिंग भरले जाते. सफरचंदापासून प्रामुख्याने गोड पदार्थ बनवले जातात.