धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, पाण्याचे कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. शरीरातील हाडे दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर जास्त लक्ष दिले जात नाही. कालातंराने हाडांची झीज होते आणि आरोग्य बिघडून जाते. बऱ्याचदा सांधेदुखी किंवा कंबर, पाठ दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या गोळ्या खाल्ल्या जातात. पण सतत पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे हाडांच्या वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील मसाल्यांचा आहारात समावेश करावा. (फोटो सौजन्य – istock)
हाडांच्या दुखण्यावर Natural Painkiller प्रमाणे काम करतात स्वयंपाक घरातील 'हे' मसाले, आहारात करा समावेश

जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म हाडांना आलेली सूज कमी करतात आणि वेदनांपासून आराम मिळवून देतात.

आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास स्नायूंमध्ये वाढलेला वेदना कमी होण्यासोबतच शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल.

लवंगामध्ये 'युजेनॉल' नावाचे तेल असते, ज्यामुळे हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात. यासोबतच लवंग तेल हिरड्यांच्या वेदनांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.

दालचिनीमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हाडांना आलेली सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते. सकाळी उपाशी पोटी नियमित दालचिनीचे पाणी प्यावे.

जेवण बनवताना लसूणचा आवर्जून वापर केला जातो. जेवणात जर लसूण नसेल तर पदार्थाला चांगली चव लागत नाही. रिकाम्या पोटी एक लसूण पाकळी चावून खाल्ल्यास शरीराला फायदे होतील.






