प्रत्येक महिलेच्या कपाटात असायला हव्यात 'या' उठावदार रंगाच्या साड्या
जांभळ्या रंगाच्या साड्या फार कमी महिलांकडे असतात. पण जांभळा रंग कोणत्याही त्वचेच्या रंगावर अतिशय सुंदर दिसतो. सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, बनारसी, कॉटन इत्यादी फॅब्रिकमध्ये तुम्ही जांभळ्या रंगाची साडी खरेदी करू शकता.
एमेरल्ड ग्रीन रंगाची साडी लग्न समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात अतिशय सुंदर दिसेल. ही साडी नेसल्यानंतर अतिशय स्टयलिश आणि क्लासी दिसेल.
सर्वच महिलांना मरून रंग खूप जास्त आवडतो. लाल रंगाच्या शेडमध्ये येणार मरून रंग सर्वच त्वचेच्या रंगावर अतिशय सुंदर दिसतो. त्यामुळे हेवी वर्क असलेली साडी खरेदी करताना मरून रंगाची निवड करू शकता.
गोल्डन रंग अतिशय रिच आणि क्लासी लुक देतो. प्रत्येक महिलेच्या कपाटात एक तरी गोल्डन रंगाची साडी असावी. गोल्डन रंगाच्या साडीवर तुम्ही कोणत्याही रंगाचा हेवी ब्लाऊज घालू शकता.
पांढरा रंग अतिशय रॉयल आणि इतरांमध्ये गेल्यानंतर खूप रिच लुक देतो. पांढऱ्या रंगामध्ये तुम्ही कॉटन, शिफॉन किंवा इतर फॅब्रिकमध्ये साडी खरेदी करू शकता.