भारताच्या या गावाला बोलतात कोब्राची राजधानी! इथे राहतात सर्वात विषारी साप, नाव वाचून व्हाल अचंबित
भारतात एक असं गाव आहे जिथे साप मोठ्या प्रमाणात आढळतात. कर्नाटकच्या वेस्टर्न घाटात टेकड्यांमध्ये असलेलं अगुंबे गावात सर्वाधिक साप आढळतात. या गावाला कोब्राची राजधानी म्हणतात.
अगुंबे कर्नाटक राज्यात स्थित आहे. वेस्टर्न घाटात हिरवळ पसरलेली आहे. हे अत्यंत छोटं गाव आहे, जे केवळ 3 वर्ग किलोमीटरमध्ये वसलेलं आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 2700 फुटउंचीवर आहे.
हा परिसर मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच त्याला "दक्षिणेचे चेरापुंजी" असेही म्हणतात.
याशिवाय, अगुम्बे हे वन्यजीवांच्या समृद्ध विविधतेसाठी देखील ओळखले जाते. किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी साप मानला जातो.
टीप - हा लेख केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही.