हँगिंग पॉट्समध्ये फुलांची रोपं घराची आणि बाल्कनीची शोभा अधिक वाढवतात. अशी कोणती फुलं लावावीत जाणून घ्या
झेंडूची फुलं लवकर उगवतात, तसंच बाल्कनीत फुललेले झेंडू दिसायलाही सुंदर दिसतात. गडद पिवळी, केशरी अशा विविध रंगाचे झेंडू लावावे
Petunia ही रंगबेरंगी फुलं आहेत आणि हँगिंग पॉट्समध्ये अधिक सुंदर पसरतात. या झाडांना मुख्यतः सूर्यप्रकाश आवडतो.
विविध रंगांची जास्वंदी हँगिंग पॉट्ससमध्ये अधिक मनमोहक दिसते आणि देवघरातही त्याचा वापर करता येतो
सदाफुली लव्हेंडर आणि पांढऱ्या रंगाची अशी हँगिंग झाडे लावल्यास बाल्कनीमध्ये रंगांची चांगली उधळण दिसून येते
गुलाबांचे विविध रंग असतात, त्याचाही तुम्ही हँगिंग पॉटमध्ये उपयोग करून घेऊ शकता. गुलाबीची झाडं दिसायलाही छान दिसतात
अबोलीची फुलं खूप फुलतात आणि ही फुलं नाजूक असून त्याचा रंग मनाला अधिक भावतो. तुम्ही आपल्या बाल्कनीत याचा वापर करावा