‘अनन्या’चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, २२ जुलैला येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
ट्रेलरमध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडणारी, आयुष्य दिलखुलास जगणारी 'अनन्या' दिसत आहे. नावाप्रमाणेच इतरांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या 'अनन्या'चा एक प्रेरणादायी प्रवास यात दिसत असून 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' हा खूप मोलाचा सल्ला देणारा हा चित्रपट आहे.