कमी Mileage असलेले हटके बाईक. (फोटो सौजन्य : Social Media)
Royal Enfield Classic 350 क्लासिक लुक्स, दमदार आवाज आणि हायवेवर कमाल कंट्रोल. पण मायलेज? फक्त ३०–३५ किमी/लिटर. शहरात वापरणाऱ्यांसाठी खिशावर भार.
Jawa 42 रेट्रो स्टाइल आणि पॉवरफुल इंजिन ही या बाईकची ओळख आहे. मात्र मायलेज सुमारे ३३ किमी/लिटर इतकं मर्यादित आहे.
Yamaha R15 V4 युवकांच्या ड्रीम स्पोर्ट्स बाईकमध्ये गणली जाणारी ही बाईक परफॉर्मन्समध्ये नंबर वन, पण मायलेज फक्त ४० किमी/लिटरच्या आसपास.
KTM Duke 250 स्पीड आणि राइडिंग स्टाइलसाठी ओळखली जाणारी ही बाईक शहरात सरासरी ३० किमी/लिटर देते. दिसायला भारी पण पेट्रोलसाठी जरा जास्त प्रेम!
TVS Apache RR 310 सुपर स्पोर्टी डिझाइन, डिजिटल डिस्प्ले, आणि उत्कृष्ट कंट्रोल. मात्र मायलेज ३४–३६ किमी/लिटर, म्हणजे लुक्स भारी पण खिसा रिकामा.