फोटो सौजन्य - istock
ऑगस्ट महिन्यात Google Pixel 9 सिरीज, iQOO Z9s, Vivo V40 आणि Nothing Phone (2a) Plus लाँच होणार आहे. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे फोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात.
13 ऑगस्ट 2024 रोजी Google Pixel 9 सिरीज लाँच होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी गुगलने हार्डवेअर इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमध्ये Pixel 9 Pro Fold, Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL आणि Pixel 9 Pro लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Google Pixel 9 सिरीज गडद राखाडी, हलका राखाडी, गुलाबी आणि ऑफ-व्हाइट रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फोनमध्ये सेल्फी कॅमेरासाठी होल-पंच कटआउटसह डिस्प्ले आहे. फोनचा बॅक पॅनल मॅट फिनिशमध्ये उपलब्ध असेल. Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL मध्ये 42-MP कॅमेरा मिळू शकतो. तर Google Pixel 9 आणि Google Pixel 9 Pro Fold 10 MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज असू शकतात.
iQOO Z9s ची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी हा फोन ऑगस्टमध्ये लाँच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा फोन चिनी मार्केटमध्ये आधीच उपस्थित असलेल्या iQOO Z9 Turbo चे नवीन अपडेट आहे. यात Qualcomm Snapdragon 8s Gen 3 चिपसेट असेल. तसेच 1.5K OLED डिस्प्ले 144Hz च्या कमाल रिफ्रेश रेटसह आणि 6,000mAh बॅटरी देखील असू शकते.
Vivo V40 जुलैमध्ये लाँच होण्याची अपेक्षा होती, मात्र अद्याप हा फोन लाँच झालेला नाही. आता हा फोन ऑगस्टमध्ये लाँच होणार असल्याचं समोर येत आहे. यामध्ये Vivo V40 स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 चिपसेट आहे.
Nothing Phone (2a) Plus जुलैच्या शेवटच्या दिवशी रिलीज होत आहे, हा परफॉर्मन्स आधारित फोन MediaTek Dimensity 8300 chipset सह आणला जाऊ शकतो.