महाराष्ट्रातील तो किल्ला जो औरंगजेबाला कधीही शोधता आला नाही; इथे शत्रूंना मिळायची कडेलोटाची शिक्षा
महाराष्ट्रात अनेक गडकिल्ले आहेत, प्रत्येक किल्ल्याचे आपले असे वैशिष्ट्य आहे. असाच एक गुप्त किल्ला म्हणजे वासोटा किल्ला. इथे फितूर किंवा शत्रूंना कडेलोटाची शिक्षा केली जायची
हा महाराष्ट्रातील एक असा गुप्त किल्ला आहे, जो औरंगजेबाला कधीही सापडला नाही. इथून सह्याद्रीच्या डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसते
सातारा शहराच्या पश्चिमेस 40 किमी अंतरावर जावळी तालुक्यात सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वासोटा किल्ला वसला आहे. वासोटा किल्ला हा वनदुर्ग प्रकारात मोडतो
बामणोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर तलाव पार करावा लागतो. तुम्ही बोटीने हा तलाव पार करु शकता. हा किल्ला घनदाट जंगलात वसलेला आहे
वासोटा किल्ला हा इतिहासप्रेमी, निसर्गरप्रेमी आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. घनदाट जंगलात लपलेला हा किल्ला दुर्गम असला तरी अद्वितीय आहे