
कामदा एकादशी निमित्त आज विठ्ठल मंदिरास द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे.
विठुरायाच्या राऊळीला सजावट करण्यासाठी तब्बल 700 किलो द्राक्षांचा वापर करण्यात आला आहे.
मंदिराचा गाभारा, चौखांबी आणि सोळखांबीमध्ये ही द्राक्ष सजावट करण्यात आली आहे.
चैत्रीशुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्याहस्ते करण्यात आली.
तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली.