(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच दुबई ट्रीप करून भारतात परतली आहे. अभिनेत्रीने या दुबई ट्रीपची झलक आता चाहत्यांसह शेअर केली आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे कुटुंब दिसत आहे. ज्यामध्ये तिची बहीण, आई आणि बहिणीची मुलं दिसत आहेत.
अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाचा फ्लोरल गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. आणि सोबतच तिने गॉगल देखील घातला आहे.
तसेच, अमृताच्या दुसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या आईसोबत आणि बहीण अदिती खानविलकरसह पोज देताना दिसत आहे. त्यामध्ये तिघीही खूप सुंदर दिसत आहेत.
याचदरम्यान अभिनेत्री अमृता खानविलकर बहीण अदितीच्या मुलांसोबत मस्ती, मज्जा करताना दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री खूप खुश दिसत आहे.