काठपदरच्या साडीवर परिधान करा 'या' लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन्स
कांजीवरम स्लिक किंवा पैठणी साडी घेतल्यानंतर त्यावर कसा ब्लाऊज शिवावा. हे बऱ्याचदा समजत नाही. अशावेळी तुम्ही बंद गळ्याचा ब्लाऊज शिवून त्यावर वन साईड पदर घेऊ शकता.
लांब हातांचे ब्लाऊज कोणत्याही साडीवर सुंदरच दिसतात. त्यामुळे सणावाराच्या दिवसांमध्ये तुमचा लुक आणखीनच सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी लांब हाताचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
हल्ली आरी वर्क करून तयार केलेले ब्लाऊज सोशल मीडियावर खूप जास्त फेमस आहेत. तुमच्या साध्या साडीला अतिशय क्लासी आणि मॉर्डन लुक देण्यासाठी तुम्ही आरी वर्क केलेले ब्लाऊज तयार करून घेऊ शकता.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती नेहमीच पारंपरिक लुक शेअर करत असते. त्यामुळे तिच्या ब्लाऊज डिझाइन्सची प्रेरणा घेऊन सुंदर ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
काठपदर साडीला माॅडर्न टच देण्यासाठी तुम्ही स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान करू शकता. स्लिव्हलेस ब्लाऊज तुमचा लुक अधिक सुंदर आणि क्लासी करेल.