JIO HOTSTAR वर 'ताजा खबर' या वेब सिरीजचे दोन सीजन उपल्बध आहेत. (फोटो सौजन्य - Social Media )
भुवन बाम याने या सिरीजमध्ये वसंत गावडे नावाचे पात्र साकारले आहे. 'ताजा खबर' ही वेब सिरीज Jio Hotstar पाहता येऊ शकते.
वसंत मुंबईच्या छोटाशा चाळीत राहणारा एक अत्यंत गरीब मुलगा दाखवला गेला आहे. शौचालयाची देखभाल करण्याची नोकरी तो करत असतो.
अचानक त्याला त्याच्या मोबाईलमध्ये एक application सापडते. ज्याच्या माध्यमातून त्याला भविष्यातील बातम्या वर्तमानात मिळतात.
या App च्या साहाय्याने तो वाईट पद्धतीने बक्कळ पैसे कमवतो. शौचालयाची देखभाल करणारा वस्त्या मुंबईतील गडगंज श्रीमंत असा वसंत शेठ म्हणून ओळखला जातो.
पण वाईट कामात त्याला अनेक जणांशी शत्रुत्व येतो. यातून तो कसा सावरतो? हे पाहण्यासाठी 'ताजा खबर' ही २ सीजनची वेब सिरीज नक्की पहा.