'FA9LA' चा खरा अर्थ माहित आहे का?
धुरंधर चित्रपटातील "FA9LA" हे एक अरबी गाणं आहे. सध्या सोशल मिडियावर प्रत्येकाच्या फिडवर हे गाणं दिसून येत आहे.
गाण्याचे बोल अनेकांना ठाऊक नसले तरी प्रत्येकजण याला गाण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला या गाण्याच्या ओळी आणि याचा अर्थ जाणून घेऊया.
FA9LA हे गाणं बहरीनचा रॅपर हुसम असीम ज्याला Flipperachi असेही म्हटले जाते, याने गायले आहे. गाण्यात खलिजी हिप-हाॅप आणि आधुनिक बीट्सचा वापर करण्यात आला आहे.
गाण्याचा बोल आहेत - "याखी दूस दूस 3इंडी खोश फासला...याखी तफूज तफूज वल्लाह खोश रक्षा... 3इंडी लक रक्सा काविया या अल-हबीब... इस्माहा साबुहा खतभा नसीब...मिड याक झिंक बटा३तिहा कफा... वा हेज जितफिक 7eel Khallik Shadid
गाण्याचा अर्थ आहे - भाऊ, जोरात नाच, मी खूप मजा करण्याच्या मूडमध्ये आहे... भाऊ, बाजूला हो, देवाची शपथ, चला छान नाच करूया... माझ्या मित्रा, तुझ्यासाठी एक छान डान्स स्टेप आहे... तिचे नाव साबुहा आहे, नियतीने ते फक्त तुझ्यासाठी लिहिले आहे... तुमचे हात वर करा आणि तालावर चालवा... तुमचे खांदे जोरात हलवा, खंबीर राहा.