खूब लड़ी मर्दानी वह झाँसी की रानी! महाराणी लक्ष्मीबाईंची शेवटची इच्छा काय होती? 700 हुन अधिकांनी दिली होती आपल्या प्राणांची आहुती
राणी लक्ष्मीबाईंचे बालपणीचे नाव मणिकर्णिका तांबे होते. त्यांचा जन्म वाराणसी येथे एका महाराष्ट्रीय कर्हाड ब्राह्मण कुटुंबात झाला. झाशीचा राजा गंगाधर राव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचं नाव राणी लक्ष्मीबाई झाले
लग्नानंतर काही वर्षांनी गंगाधर राव यांचे निधन झाले, त्यानंतर इंग्रजांनी झाशी ताब्यात घेण्याची योजना बनवली. परंतु २२ वर्षीय राणीने तिची झाशी इंग्रजांना देण्यास नकार दिला. १८५७ मध्ये मेरठमध्ये उठाव सुरू झाल्यानंतर लक्ष्मीबाईंना झाशीचे शासक म्हणून घोषित करण्यात आले
यानंतर इंग्रज आणि झाशी यांच्यात युद्ध सुरू झाले. इंग्रजांच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्याला वेढा घातला आणि त्यानंतर एक भयंकर युद्ध सुरू झाले. लहान सैन्य असूनही, त्यांनी इंग्रजांविरुद्ध कठोर लढा दिला आणि शेवटपर्यंत आपला पराभव स्वीकारला नाही. पण १८ जून १८५८ रोजी इंग्रजांशी लढताना त्या गंभीर जखमी झाल्या
त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथून वाचवले आणि आश्रमासारख्या ठिकाणी नेले, जिथे राणीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. राणी लक्ष्मीबाईंची इच्छा होती की, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शरीर इंग्रजांच्या हाती लागू नये