कुठे आहे ही कर्मण रेषा जिथे पृथ्वी संपते आणि अंतराळ जग सुरु होते
आम्ही तुम्हाला सांगतो की, ही रेषा पृथ्वीपासून १०० किलोमीटर उंचीवर आहे, जिला कार्मण रेषा असं म्हटलं जातं.
कार्मण रेषा ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवर असलेली काल्पनिक रेषा आहे, जी पृथ्वीचे वातावरण बाह्य अवकाशापासून वेगळे करते आणि अंतराळाची सुरुवात दर्शवते.
ही रेषा पृथ्वीच्या वातावरणाची जाडी आणि अंतराळाची सुरुवात यामधील एक सीमा दर्शवते.
अशी मान्यता आहे की, या रेषेच्या पुढे अंतराळ आहे आणि तेथे पारंपरिक विमानांसारखे उड्डाण करणे शक्य नसते, कारण हवा खूप विरळ असते. येथे कोणतेही विमान उडू शकत नाही.
या रेषेचं नाव हंगेरियन-अमेरिकन अभियंता थियोडोर वॉन कार्मन याच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.