बिग बॉसच्या इतिहासामधील सर्वात ग्लॅमरर्स महिला सदस्य - फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रुबिना दिलेकने सीझन १४ मध्ये तिच्या स्टाइल स्टेटमेंटने खळबळ उडवून दिली होती. रुबिनाने भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. तिचा मेकअप असो की हेअर स्टाइल, प्रत्येक गोष्टीची खूप चर्चा झाली. तिला बघून असं वाटत होतं की या शोमध्ये खरोखरच मोठी अभिनेत्री आली आहे.
हिना खान बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात स्टायलिश स्पर्धक आहे. सोबत भरपूर कपडे घेऊन घरात जाणारी ती पहिली स्पर्धक होती. त्याच्या आधी कोणीही शोमध्ये इतके कपडे आणले नव्हते. ती दिवसातून अनेक वेळा पोशाख बदलायची. हिनाचा प्रत्येक लूक खूपच ट्रेंडिंग होता. त्याचबरोबर सिझन ११ मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय स्पर्धक आणि मजबूत स्पर्धक म्हणून अजूनही ती बिग बॉससाठी ओळखली जाते.
'बिग बॉस १८ मधील चुम दारंग हिने सुरुवातीपासून सांगितले आहे की, ती तिचे राज्य अरुणाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शोमध्ये आली आहे. यावेळी तिने तेथील संस्कृतीचे अनेक ड्रेस त्याचबरोबर ती एक बॉलीवूड अभिनेत्री असल्यामुळे तिचा फॅशन सेन्स प्रेक्षकांना सीझनमध्ये आवडला आहे.
बिग बॉसने शहनाज गिलचे नशीब बदलले आहे. या शोपूर्वी शहनाजला क्वचितच कोणी ओळखत असेल, परंतु तिची प्रतिभा आणि गोंडस शैली तिला आज बॉलिवूडमध्ये घेऊन गेली आहे. त्याचबरोबर तिचा फॅशन गेम पॉइंटवर होता, कॅज्युअल लूक असो वा पारंपारिक पंजाबी लूक किंवा वेस्टर्न गाऊन, शहनाजचा प्रत्येक लूक आजपर्यंत व्हायरल झाला आहे.
बिग बॉस १८ ची फॅशनमध्ये कसर न सोडणारी स्पर्धक म्हणजेच इशा सिंह. अभिनेत्रीने शोमध्ये फार काही योगदान केले नाही तिच्या बऱ्याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा तिला ट्रॉल करण्यात आले आहे पण तिने तिच्या फॅशनने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध जस्मिन भसीन सुद्धा रुबिनाप्रमाणेच कपडे घालायची. शोमध्ये सौंदर्य आणि ग्लॅमर जोडण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नाही. जस्मिन जेव्हा-जेव्हा तयार झाली तेव्हा शोचा होस्ट सलमान खानसुद्धा सिझन १४ मध्ये तिची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
'बिग बॉस ७' विजेती गौहर खानही फॅशनच्या बाबतीत कोणापासून मागे राहिली नाही. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री होती आणि तिचे हे गुण या शोमध्येही पाहायला मिळाले. गौहरने या शोमध्ये तिच्या सौंदर्याची जादू अशा प्रकारे वापरली की केवळ चाहत्यांचीच मने नाही तर या रिॲलिटी शोची ट्रॉफीही तिच्या हातात आली.