पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानलं जातं. हा रंग आशावाद आणि सकारात्मकता दर्शवतो.
याचकारणासाठी हा पांढरा रंग मदत करतो.
असं म्हणतात की, 1800 च्या काळात रक्ताचे डाग दिसू नयेत म्हणून डॉक्टरांचे काळे कोट असायचे. मात्र रक्त आणि काळ्या कोटामुळे रुग्ण घाबरुन पळायचे. ही बाब लक्षात आल्यावर वैद्यकीय विभागात काही बदल करण्यात आले.
कालांतराने पांढरा रंगाच्या कोटावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
याचं कारण असं की, डॉक्टर सतत रुग्णांच्या संपर्कात असाता त्यामुळे त्यांचा कोट जंतुनाशक करणं गरजेचं असतं.
पांढऱ्या रंगाचा कोट 90 डिग्रीपर्यंतच्या उष्णतेत जंतुनाशक होतो त्यामुळे पांढऱ्या रंगाला जास्त प्राधान्य 1900च्या काळात दिलं गेलं.