अष्टगंध, अबीर आणि चंदन यांचं मिश्रण असलेला गंध विठ्ठलाच्या कपाळी लावला जातो. या गंधांचं अनेकांना आकर्षण वाटतं. विठ्ठलाच्या भाळावर गोलाकार टिळा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो.
पुराणानुसार असं सांगितलं जातं की, विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. विष्णूंचं मूळ स्वरुपाचा विचार केल्यास लक्षात येते की, क्षीरसागरात वास्तव्यास असलेले विष्णू शेषनागारावर विराजमान आहेत.
शेषनाग हा विष्णूंच्या कायमच बरोबर असायचा. हा शेषनाग विष्णूंना त्याचा स्वामी मानत असे.
विठ्ठल रुप धारण केल्यानंतर शेषनाग काही काळातकरीता विष्णूंपासून दुरावला गेला. म्हणूनच शेषनागाचं प्रतिक या अर्थाने विठ्ठालाने कपाळावर टिळा लावला आहे.
विठ्ठलाच्या कपाळावरचा गोळाकार चंदनाचा टिळा हा त्याच्या नाकाजवळ निमुळता होत जातो. म्हणजेच हा आकार शेषनागाच्या फण्यासारखा आहे.
या चंदनाच्या गोलाकार टीळ्याच्यामध्ये काळ्या रंगाचा छोटासा ठिपका आहे. हा ठिपका अबीराने लावला जातो. याचा अर्थ शेषनागाच्या काळ्या रंगाच्या कांतीसमान हा रंग आहे.
या अशा रितीने मूळ अवतारात विष्णूंच्या बरोबर असलेल्या शेषनागाच्या भक्तीप्रति विठ्ठल रुपाने विष्णूंनी या शेषनागाला मस्तकी धारण केलं आहे.