उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटात थंडावा टिकून राहावा म्हणून ताक प्यायले जाते. ताक, दही, लस्सी इत्यादी पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यासोबतच खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी एक ग्लासभर ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक का प्यावे? ताक पिण्याची योग्य वेळ आणि फायदे? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात नियमित ताक का प्यावे? जाणून घ्या ताक पिण्याची योग्य वेळ आणि फायदे

कडक उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी ताक प्यावे. ताक हे नैसर्गिक पेय मानले जाते. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

शरीराचे वाढलेले तापमान आणि पोटात वाढलेली जळजळ, आग कमी करण्यासाठी दुपारी जेवल्यानंतर ताक प्यावे. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी ताक प्रभावी पेय आहे.

ताकामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये चांगल्या विषाणूंची वाढ होते आणि पचनक्रिया सुरळीत चालू राहते. उन्हाळ्यात गॅस किंवा अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ताक प्यावे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार बाहेर पडून जातात. ज्यामुळे खूप जास्त थकल्यासारखे वाटते. अशावेळी ताक प्यायल्यास तुम्हाला ताजेतवाने आणि फ्रेश वाटेल.

ताक किंवा दही कायमच दुपारच्या जेवणानंतर खावे. इतर कोणत्याही वेळी ताक पिऊ नये. यामुळे पचनक्रिया बिघडते. ताकामध्ये विटामिन बी-१२, कॅल्शियम आमि पोटॅशियम इत्यादी घटक असतात.






