रोहतासगड किल्ला : रोहतासगड किल्ला हा देशातील सर्वाधिक प्राचीन किल्यांपैकी एक आहे. सोन नदिच्या काठावर वसलेला हा किल्ला रोहिताश्व राजाच्या नावाने ओळखला जातो असं म्हटलं जातं.
तेलहारा: तेलहारा हे एक प्रमुख पुरतत्वीय स्थळ आहे. बौद्ध संस्कृतीतील शैक्षणिक केंद्र म्हणून एकेकाळी याची ओळख होती. खास या ठिकाणाला भेट देण्यासाठी नालंदा जिल्ह्यात पर्यटक आवर्जून येतात.
राजनगर: स्थापत्य़शैलीचा उत्तम नमुना म्हणून या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहिजे. ऐतिहासिक मंदिरे आणि राजवाड्यांनी सजलेलं हे ठिकाण आहे. असं म्हटलं जातं की येथील बऱ्याचशा वास्तू या पूर्वीच्या दरभंगा राज्याच्या शासकांनी बांधल्या होत्या.
मुंगेर : बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील मुंगेर किल्ला ही प्रचीन ऐतिहासिक वास्तू आहे. या परिसरात अनेक स्मारकं पाहायला मिळतात.
बाराबार लेणी : मौर्य साम्राज्याचा इतिहासाची साक्ष देणारी बाराबार लेणी. मौैर्य काळात दगडावर कोरलेल्या या लेण्या आजही तितक्याच सुरेख आहेत.
केसरिया : हे जगातील सर्वात उंच आणि भव्य बौद्ध स्तूपांपैकी एक केसरिया. या ठिकाणी प्राचीन बौैंद्ध संस्कृतीचं दर्शन घडतं.