Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश

पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे, असे निर्देश मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 16, 2026 | 07:36 PM
Tourism News: “पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची…”; मंत्री शंभूराज देसाईंचे स्पष्ट निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

एप्रिलमध्ये डोंगरी महोत्सवाचे आयोजन केले जाणार 
नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी प्रशिक्षण दिले जाणार 
मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली महत्वाची बैठक

मुंबई: राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पर्यटन विभागातंर्गत विविध महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. आगामी कालावधीत डोंगरी महोत्सवाचे एप्रिल महिन्यात नियोजन करावे. या महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम, नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कृषी पर्यटन, ‘आई’ पर्यटन धोरणावर केंद्रित स्थानिक महिला सशक्तीकरण कार्यक्रमांचे आयोजन, गड-किल्ले दर्शन, विविध साहसी उपक्रम, पॅराग्लायडींग, पॅरामोटरिंग, रॉक क्लायबींग, सीप्लॅन राईड हे उपक्रम आयोजित करण्यात यावेत. स्थानिक ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम असतील असे पहावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, राज्यातील ७५ पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आधुनिक मुलभूत सोयी-सुविधायुक्त नमो पर्यटन केंद्र व माहिती सुविधा केंद्र स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आली असून पहिल्या टप्प्यातील प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर व रायगड येथील कामे गतीने करावीत. राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमासाठी ७५०० प्रशिक्षणार्थ्यांपैकी प्रथम २५०० व उर्वरित ५००० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देशही पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

पर्यटनस्थळे बनतायत पर्यटकांची नवी पसंती

ग्रामीण पर्यटन ही महाराष्ट्राची नवी ओळख बनत आहे. गावात राहण्याचा अनुभव, स्थानिक शेती, लोककला आणि पारंपरिक जेवण यामुळे पर्यटकांना वेगळा अनुभव मिळतो. यामुळे गावांचा आर्थिक विकासही साधला जात आहे. महाराष्ट्रातील नव्याने विकसित होणारी पर्यटनस्थळे राज्याच्या पर्यटन उद्योगाला नवे बळ देत आहेत. आधुनिक सुविधा, निसर्गसंपदा आणि सांस्कृतिक वारसा यांचा योग्य समन्वय साधून महाराष्ट्र लवकरच भारतातील टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशन म्हणून ओळख मिळवेल. पर्यटकांसाठी हा बदल नक्कीच आनंददायी ठरणार आहे.

2026 मध्ये कधी कधी आहेत लाँग वीकेंड? हॉलिडे लिस्ट पहा आणि ट्रॅव्हल प्लॅन बनवा

 साहसी पर्यटनासाठी नवी ठिकाणे

साहसी पर्यटन प्रेमींसाठी महाराष्ट्रात स्कायडायव्हिंग, पॅराग्लायडिंग, रॉक क्लाइंबिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी नवी केंद्रे विकसित होत आहेत. सातारा, कोलाड, भंडारदरा आणि नाशिक परिसरात अ‍ॅडव्हेंचर टुरिझमला मोठी मागणी आहे.

Web Title: Shambhuraj desai instructions to promote tourist places to promote maharashtra tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • Shambhuraj Desai
  • Tourism news

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai: देशहित प्रथम! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाईंचा प्रतिसाद; कुटुंबासह नियोजित ‘युरोप दौरा’ केला रद्द!
1

Shambhuraj Desai: देशहित प्रथम! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला शंभूराज देसाईंचा प्रतिसाद; कुटुंबासह नियोजित ‘युरोप दौरा’ केला रद्द!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.