भारतीय मसाल्यांचा सुगंध जगभरात पसरला आहे. जगभरात मसाल्यांना मोठी मागणी आहे. वेगवेगळे पारंपरिक चवीचे पदार्थ तयार करताना त्यात हळद, लाल तिखट आणि सुगंधी गरम मसाला टाकला जातो. यामुळे जेवणाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. पूर्वीच्या काळापासून जेवण बनवण्यासाठी आणि शरीरसंबंधित आजारांवर औषध म्हणून सुद्धा मसाल्यांचा वापर केला जातो. पण काही वर्षांमध्ये भारतीय मसाल्यांच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मसाल्यांची वाढती किंमत केवळ मार्केटिंग नसून उत्पादनासाठी लागणारे कष्ट आणि मर्यादित उपलब्धते वाढत आहे. चला तर जाणून घेऊया किंमतीने महाग असलेल्या मसाल्यांची नावे. (फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरातील मसाल्यांच्या किमतींमध्ये का होत आहे वाढ? जाणून घ्या सोन्यापेक्षा महाग असलेल्या मसाल्यांची नावे

जगातील सगळ्यात महागडा मसाला म्हणजे केशर. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये केशरला विशेष मागणी आहे. क्रोकस नावाच्या फुलांच्या नाजूक भागांपासून तयार केले जाणारे केशर शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. १ किलो केशराची किंमत ३ लाखांपर्यंत असते.

औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाणारे हिंग किंमतीने अतिशय महाग आहे. कारण हिंगाचे उत्पादन करण्यासाठी लागवड आणि राळ काढण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि वेळखाऊ असल्यामुळे किंमत सुद्धा जास्त आहे.

वेलचीला मसाल्यांची राणी म्हणून ओळखले जाते. वेलचीच्या लागवडीसाठी विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते. वेलचीची संपूर्ण तोडणी हाताने करावी लागते.

सुकलेल्या फुलांपासून लवंग बनवली जाते. योग्य वेळात लवंग काढणे ही सुद्धा एक कला आहे. इंडोनेशियामध्ये लवंगाची किंमत सध्या १,३०० ते २,२९९ रुपये प्रति किलोपर्यंत आहे.

झाडाच्या सालींपासून तयार केलेली सिलोन दालचिनी जगातील अतिशय सुद्धा आणि महाग मानली जाते. दालचिनीचे सर्वाधिक उत्पादन श्रीलंकेमध्ये घेतले जाते.






