समुद्राच्या खारट पाण्याचं रहस्य माहीत आहे का? समुद्रात एवढं मीठ येतं कुठून? जाणून घ्या
समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे. समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही.
पण समुद्रात इतके मीठ कोठून आले की पाणी खारट झाले? आपल्या पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे. यामध्ये केवळ 3 टक्के पाणी पिण्यायोग्य असून उर्वरित समुद्राचे खारट पाणी आहे.
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननुसार, जर सर्व महासागरातून सर्व मीठ बाहेर काढून जमिनीवर पसरले तर त्याचा थर 500 मीटर उंच असेल.
समुद्रात मिठाचे दोन स्त्रोत आहेत. महासागरातील बहुतेक मीठ नद्यांमधून येते. पावसाचे पाणी थोडे अम्लीय असते, जेव्हा हे पाणी जमिनीच्या खडकांवर पडते तेव्हा ते नष्ट होते आणि त्यातून तयार होणारे आयन नद्यांमधून महासागरात पोहोचतात. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.
याशिवाय, समुद्रात येणारा मीठाचा आणखी एक स्रोत आहे, तो म्हणजे समुद्रतळातून येणारा थर्मल द्रव. हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत, तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात.
या छिद्रे आणि विवरांमुळे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात. महासागर आणि समुद्रातील पाण्यामध्ये क्लोरीन आणि सोडियमचे बहुतेक आयन असतात. या कारणांमुळे समुद्राचे पाणी खारटं असते आणि आपण या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू शकत नाही.