मानसिक तणाव जाणवतोय ? महिलांनो ! 'या' लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करु नका
थकवा जाणवणं - सतत थकल्यासारखं वाटणं, झोप झाल्यावरही शरीर फ्रेश न वाटणं, हे थायरॉईड, अॅनिमिया, मानसिक ताण किंवा हृदयाच्या समस्यांचं लक्षण असू शकतं.
अनियमित पाळी- अनियमित पाळी किंवा अचानक पाळी बंद होणं ( Menopause) अनियमित पाळी, किंवा बऱ्याच महिन्यांपासून पाळी न येणं या समस्या महिलांमध्ये दिसून येतात. .या समस्या PCOS, थायरॉईड, गर्भाशयासंबंधी समस्या किंवा हार्मोनल असंतुलनाचं कारण असू शकतं.
पोट फुगणं - पोट सतत फुगलेलं असण किंवा दुखणं सतत पोट फुगणं, विशेषतः जेवणानंतर किंवा विश्रांतीनंतरही, हे पचनसंस्थेचा त्रास, अंडाशयातील गाठ, यांचा लक्षण असू शकतं.
सतत धाप लागणं- काही न करता सुद्धा धाप लागणे, छातीत जडपणा जाणवणे- स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणं नेहमी पारंपरिक नसतात. श्वास पुरत नसेल, छातीत दडपण जाणवत असेल, किंवा खांदा/जबड्याला त्रास होत असेल तर हे हृदयाचे आजार असण्याचे संकेत असू शकतात.
वजन वाढणं -अचानक वजन भरपूर प्रमाणात वाढणं किंवा घटणं - जास्त खाणं न करता वजन वाढणं, किंवा खूप खाल्लं तरी वजन घटणं हे थायरॉईड, PCOS, मधुमेह किंवा हार्मोनल असंतुलनाचं लक्षण असू शकतं.
केस गळणं-केस गळणं, त्वचेचा कोरडेपणा किंवा अॅक्ने- केस गळणं, त्वचेला कोरडेपणा, अचानक मुरुम येणं — हे शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता (Vitamin D, B12, Zinc), हार्मोन्सची असंतुलन, किंवा PCOSचं लक्षण असू शकतं.
मूड स्विंग्स सततचे मूड स्विंग्स, चिंता, किंवा नैराश्य - सतत मानसिक अस्वस्थता, रडू येणं, चिडचिड, किंवा झोप न लागणं हे हार्मोनल असंतुलन, किंवा स्ट्रेसचा परिणाम असू शकतो.