जगभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या आणि चवीच्या कॉफी मिळतात. मात्र जगात सर्वात महाग कॉफी कोणती तुम्हाला माहीत आहे का? ही कॉफी कशी बनवली जाते जाणून घ्या
कोपी लुवाकचे नाव "लुवाक" च्या नावावरून पडले आहे, हे एक प्रकारचे सिव्हेट मांजर प्रजाती आहे, जी इंडोनेशियामध्ये आढळते. त्याची शेपटी माकडासारखी लांब असते
लुवाक कॉफी सिव्हेट मांजरीच्या शौचापासून बनविली जाते. यासाठी, मांजरीला प्रथम कच्ची कॉफी चेरी खायला दिली जाते. मग त्याच्या स्टूलसह बाहेर पडणाऱ्या भागातून कॉफी तयार केली जाते
असे मानले जाते की मांजरीच्या आतड्यातून गेल्यानंतर कॉफी अधिक चवदार बनते. या कॉफीला जगभरात प्रचंड मागणी असून ही अत्यंत महाग मिळते
लुवाकच्या शौचातून बाहेर पडणारे कॉफी बीन्स धुतले जातात, भाजले जातात आणि त्यांना जंतूमुक्त करण्यासाठी अनेक प्रक्रिया केल्या जातात
जगातील सर्वात महाग कॉफी असून याची किंमत हजारो रूपयांमध्ये आहे. एक किलो लुवाक कॉफीची किंमत 50 हजार रुपये आहे
लुवाक कॉफीच्या एका कप कॉफीसाठी 2-6 हजार रुपये मोजावे लागतात. अनेक देशांमध्ये ही कॉफी उपलब्ध आहे