
नॅशनल कॉन्फरन्सच्या खासदाराने केली राजीनाम्याची घोषणा, पक्षही सोडला
मेहदी यांनी स्पष्ट केले की, त्यांचा हा निर्णय कोणत्याही पद किंवा वैयक्तिक नाराजीमुळे नसून तत्त्वे आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आहे. नॅशनल कॉन्फरन्सने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कलम ३७० ची पुनर्स्थापना, राजकीय कैद्यांची सुटका आणि जम्मू-काश्मीरच्या घटनात्मक हक्कांचे रक्षण यांसारख्या मुद्द्यांवर जनतेचा पाठिंबा मागितला होता; परंतु सत्तेवर आल्यानंतर पक्षाने ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी अपेक्षित पावले उचलली नाहीत. विश्वासाघातात सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हा त्यांचा उद्देश नसून, जम्मू-काश्मीरमधील प्रामाणिक आणि कटिबद्ध तरुणांना एकत्र आणून नवीन राजकीय मंच तयार करणे हा त्यांचा हेतू आहे.
ओमर अब्दुल्लांवर निशाणा
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यावर निशाणा साधताना मेहदी म्हणाले की, तुम्ही ज्या खुचींवर बसला आहात, ती तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी दुःखाचे कारण आहे. साधारणपणे खुर्ची गेल्यावर नेते दुःखी होतात, पण मी खुर्ची सोडत असून त्यात आनंदी आहे. खरा सन्मान पाहायचा असेल तर वडगामला या, असा टोला त्यांनी ओमर अब्दुल्ला यांना लगावला.
जनतेसाठी लढा
मेहदी यांनी समर्थकांना सांगितले की, त्यांचा लढा कोणत्याही वैयक्तिक पदासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी नसून जनतेला दिलेली आश्वासने आणि तत्त्वांसाठी आहे. त्यांनी पालकांनाही आवाहन केले की, त्यांनी आपल्या मुलांना समाजात बदल घडवून आणण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहित करावे.
1. आगा सैयद रुहुल्लाह मेहदी यांनी काय घोषणा केली?
श्रीनगरचे नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सैयद रुहुल्लाह मेहदी यांनी पक्ष सोडण्याची आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
2. मेहदी यांनी राजीनाम्याची घोषणा कुठे केली?
वडगाम येथील बेहिश्त-ए-जहरा पार्कमध्ये वडील आगा सैयद मेहदी यांच्या २६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित जाहीरसभेत त्यांनी ही घोषणा केली.
3. मेहदी यांनी नॅशनल कॉन्फरन्स नेतृत्वावर काय आरोप केला?
पक्षाने २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सत्तेवर आल्यानंतर पूर्ण करण्यासाठी अपेक्षित पावले उचलली नसल्याचा आरोप त्यांनी केला.