Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash Death: कमी दृश्यमानता, मग लँडिंग का? अपघातानंतर उपस्थित झालेले ५ प्रश्न

कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगमध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, समोर आलेल्या अपघाताच्या एका व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 28, 2026 | 05:45 PM
Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Ajit pawar Plane crash News Update, Ajit Pawar death News,

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन
  • लँडिंग दरम्यान उद्भवलेल्या अडचणींमुळे हा अपघात झाला असावा.
  • विमानाचे लँडिंग करण्याचा एकदा नव्हे तर दोनदा प्रयत्न करण्यात आला
 

Ajit Pawar Plane Crash Death:  राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. अपघातानंतर चौकशीची मागणी तीव्र झाली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत त्यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पण त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांचे विमान कसे कोसळले आणि कोणाचा निष्काळजीपणा जबाबदार होता, याही चर्चांना उधाणा आले आहे. या सगळ्यात अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पाच मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.

1. लँडिंगमधील तांत्रिक बिघाड

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या मते, लँडिंग दरम्यान उद्भवलेल्या अडचणींमुळे हा अपघात झाला असावा. मात्र, प्रत्यक्ष लँडिंगच्या वेळी नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला आणि त्याला कोणते घटक कारणीभूत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ajit pawar Plane crash Death: ‘अजित पवार महायुती सोडणार होते?; ममता बॅनर्जींचे खळबळजनक विधान

2. लँडिंगचे दोन अयशस्वी प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे लँडिंग करण्याचा एकदा नव्हे तर दोनदा प्रयत्न करण्यात आला. पहिल्या प्रयत्नात परिस्थिती अनुकूल नसतानाही दुसरा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच वेळी विमान कोसळले. प्रतिकूल स्थितीत दुसऱ्यांदा लँडिंगचा धोका का पत्करला गेला, याची आता चौकशी होत आहे.

3. दृश्यमानता कमी असल्यामुळे लँडिंगमध्ये अडथळा

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कमी दृश्यमानतेमुळे लँडिंगमध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र, समोर आलेल्या अपघाताच्या एका व्हिडिओमध्ये सर्व काही स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ‘कमी दृश्यमानते’चा तांत्रिक दावा किती खरा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

4. खराब दृश्यमानता असताना लँडिंगचा निर्णय का?

कमी दृश्यमानतेचा दावा केला जात असला तरी, अशा परिस्थितीत लँडिंगचा धोका का पत्करला गेला, हा मोठा प्रश्न आहे. बारामती विमानतळावर धावपट्टी स्पष्ट दिसत नसताना वैमानिकाने पर्यायी विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला नाही, याचा तपास आता विशेष समिती करत आहे.

5. ‘लिअरजेट-४५’ विमानाची विश्वासार्हता

अजित पवार ज्या ‘लिअरजेट-४५’ (Learjet 45) विमानाने प्रवास करत होते, त्याच कंपनीच्या एका विमानाला २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. सुदैवाने त्या वेळी सर्व प्रवासी बचावले होते, परंतु या विमानांच्या सुरक्षिततेबद्दल तेव्हाही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. असे असतानाही, या विमानाला उड्डाणाची परवानगी कशी देण्यात आली आणि ते प्रवासासाठी सुरक्षित होते का, याबद्दल तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar Plane Crash: शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती

विमान अपघातावर काय म्हटलं?

दुर्दैवी विमान अपघातानंतर सरकारी आणि नागरी वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित विमान ज्या कंपनीचे आहे, म्हणजेच ‘व्हीएसआर एव्हिएशन’ ही कंपनी मालक आहे. सिंग यांनी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या संशय व्यक्त केला आहे.

विमानात बिघाड?

विमानात खरचं बिघाड होता का? यावर भाष्य करताना व्ही.के. सिंह यांनी सांगितले की, आमच्या माहितीनुसार आणि रेकॉर्डनुसार हे विमान तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त होते. उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा चाचण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही.

Web Title: Ajit pawar plane crash death low visibility then why attempt a landing 5 questions raised after the accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 05:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.