शरद पवार थेट धावपट्टीवर; अजित पवारांच्या अपघाताची घेतली सविस्तर माहिती (photo Credit- X)
घटनेनंतर नवी दिल्लीत असलेले शरद पवार थेट बारामतीला पोहोचले. हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी रनवेवर उपस्थित अधिकाऱ्यांकडून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. “विमान कुठे आणि कसे कोसळले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारल्याचे सांगितले जाते.
“संपूर्ण पवार कुटुंब बारामतीला पोहोचल्यानंतर त्यांच्या संमतीने पुढचे निर्णय घेतले जातील. महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी घोषित केली आहे. तीन दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला आहे.” हे कधीही भरून न निघाणारे नुकसान आहे. लोकनेते निघून गेल्यानंतर पोकळी निर्माण होते, ती भरून काढणे कठीण आहे. संघर्षाच्या काळात आम्ही एकत्र काम केलं आहे. या घटनेवर विश्वास ठेवण्यास मन तयार होत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीला विशेष ओळख मिळवून दिली. बारामतीची ओळख केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात ‘विकासाचा मॉडेल’ म्हणून झाली आहे. या विकासाच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने फक्त राजकारणातच नाही तर सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बैठकांसाठी अजित पवार येत होते बारामतीला
बारामती विमानतळावर उतरताना चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी अजित पवार यांनी बारामतीमध्ये बैठका नियोजित केल्या होत्या. या बैठका होण्यापूर्वीच हा अपघात झाला.






