Akhilesh Yadav targets Yogi Adityanath for criticizing Muslim brothers on Holi
उत्तर प्रदेश : राज्यासह देशभरामध्ये होळी सणाचा मोठा उत्साह आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्य होळी खेळली जात आहे. उत्तर प्रदेशमधील वृंदावनची होळी आणि मणिकर्णिका घाटावरची होळी जगप्रसिद्ध आहे. मात्र राजकीय वर्तुळामध्ये देखील होळीवरुन टीकेची झोड उठवली आहे. ज्यांना रंगांची अडचण असेल त्यांनी देश सोडून जावं असे वक्तव्य योगी सरकारमधील नेत्यांनी केले आहे. तर यावरुन सपा नेते अखिलेश यादव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते म्हणाले, “ज्या लोकांना होळीच्या रंगांचा त्रास होत असेल त्यांनी हा देश सोडून इथून निघून जावं. मुळात मुस्लीम समुदाय देखील रंगांपासून दूर नाही. त्यांच्याही घरात व आयुष्यात विविध रंग आहेत. ते देखील त्यांची घरं रंगवतात. पण काही लोक रंगांमध्ये विष कालवून समाजात अस्थिरता निर्माण करू पाहतायेत. ज्यांना रंग आवड नाहीत त्यांनी देश सोडून जावे, असे वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मुस्लीम समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. होळीच्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, अखिलेश यादव यांनी आज ते मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवत आहेत, उद्या ते पीडीएविरुद्ध द्वेष पसरवतील, असा आरोप उत्तर प्रदेश सरकारवर केला आहे.
‘२०२७ मध्ये पुन्हा तुम्हाला हरवू’
पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, 2024 च्या यूपी निवडणुकीत भाजप आमच्याकडून हरला आहे आणि 2027 मध्येही भाजप पराभूत होईल. भाजपपेक्षा मोठा खोटारडा कोणी नाही. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा सरकारवर टीका केली आहे. आपण होळीचा सण एकत्र साजरा करतो. हा रंगांचा सण आहे, चला रंगांचा सण एकत्र साजरा करूया आणि एकत्रितपणे गंगा-जमुना संस्कृतीसह हा सण साजरा करूया. आम्ही उत्सवप्रिय लोक आहोत.
केशव मौर्य यांना खुर्ची खेचायची आहे
यावेळी, उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्याबद्दल अखिलेश म्हणाले की, यावेळी पीडीए कुटुंब फुटणार नाही, ते म्हणजेच केशव कोणाची तरी खुर्ची खेचू इच्छितात. यासोबतच, वक्फ बोर्ड विधेयकाबाबत ते म्हणाले की, केंद्र सरकार जाणूनबुजून मुस्लिम समुदायाला त्रास देऊ इच्छित आहे. त्यांना मुस्लिम समाजात फूट पडावी अशी इच्छा आहे. आज ते मुस्लिमांना त्रास देत आहेत, उद्या पीडीएच्या लोकांवर हल्ला होईल. होळीबाबत जी विधाने केली जात आहेत ते प्रत्यक्षात असणाऱे मुद्दे लपवण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
‘कानपूर-लखनऊ महामार्गावरील भ्रष्टाचार’
कानपूर लखनौ महामार्गावर भ्रष्टाचार होत आहे. भाजप हा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे. शेअर बाजार कोसळला. संपूर्ण बाजारपेठ विकली गेली. भाजप लोकांचा खास स्वभाव खोटे बोलणे आहे. मतदार यादीत सुधारणा करणेच योग्य नाही तर मतदारांना मतदान करता येईल याचीही खात्री करावी. चौरसिया समाजाच्या आजच्या बैठकीत मी असेही म्हटले होते की, १८ वर्षांचे झालेल्यांसाठी लवकरच मतदार ओळखपत्र बनवले जाईल, असा आरोप समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादल यांनी केला आहे.