Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought:ऐन दुष्काळात अमरावती जिल्हा परिषदेचा शाही थाट; मंत्र्यासाठी रेड कार्पेट अन् १५ अलिशान गाड्या

Maharashtra Drought: राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारने प्रशासनाला काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 21, 2026 | 03:24 PM
Amravati Zilla Parishad News, Maharashtra Drought 310 Talukas, Amravati News,

Amravati Zilla Parishad News, Maharashtra Drought 310 Talukas, Amravati News,

Follow Us
Follow Us:
  • अमरावतीत  दुष्काळाची परिस्थिती
  • ऐन दुष्काळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
  • सोहळ्यासाठी मंत्र्यांसाठी १५ आलिशान इनोव्हा गाड्यांचे बुकिंग
 

Maharashtra Drought:  पुरेशा पावसाअभावी राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे. ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारनेआर्थिक नियोजन, पाणी आणि चारा उपलब्धता तसेच निधीच्या वापरासंदर्भात स्थानिक प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत. मात्र, अमरावती जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत चालली असतानाच जिल्हा परिषदेने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ पुरस्कार सोहळा आणि परिसंवादाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण या कार्यक्रमाच्या खर्चाचा आकडा समोर आल्याने अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या कार्यक्रमासाठी मंत्र्यांच्या स्वागताकरिता तब्बल १५ आलिशान इनोव्हा गाड्यांचे बुकिंग करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत सरकारने प्रशासनाला काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने निधी खर्च करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवीन बांधकामांवरील बंदी, निधी वळवण्यासाठी मुदत, पाणी आणि चाऱ्यासाठी निधीची तरतूद, पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन, तसेच पालकमंत्र्यांवर वाढीव जबाबदारी सोपवणे अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. यासोबतच दुष्काळी भागांतील उपाययोजनांचा मासिक अहवाल सादर करणे आणि पारदर्शकता राखण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Sanjay Raut : मोदींचा राजयोग संपला? संजय राऊतांचं मोठं भाकीत, एप्रिल-मे महिन्याचा दिला इशारा!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार सोहळ्याची चर्चा

पण अमरावती जिल्ह्यातील ६९ महसूल मंडळांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद प्रशासनाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.

१५ आलिशान इनोव्हा गाड्या बुक

या पुरस्कार सोहळ्यादरम्यान ‘दुष्काळावर मात’ या विषयावर परिसंवाद कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी दहा मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात भर म्हणून स्वागतासाठी रेड कार्पेटची व्यवस्था केली जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मंत्र्यांच्या प्रवासासाठी १५ आलिशान इनोव्हा गाड्या बुक करण्यात आल्याची माहिती आहे.

Exclusive Interview: शिवसेना आमदार निलेश राणे यांची विशेष आणि रोखठोक मुलाखत!

दुष्काळाची तीव्रता चिंताजनक

या गाड्या जिल्हा परिषद परिसरात रांगेत उभ्या करण्यात आल्याने त्यांचीही चर्चा सुरू झाली. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून आर्थिक नियोजनाच्या सूचना दिल्या जात असताना, दुसरीकडे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी करण्यात आलेल्या या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निधीचा वापर किती आवश्यक आणि काटकसरीने केला जात आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमावरून का वाद सुरू झाला आहे?

    Ans: राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असताना अमरावती जिल्हा परिषदेने पुरस्कार सोहळा आणि 'दुष्काळावर मात' परिसंवादासाठी रेड कार्पेट व मंत्र्यांसाठी १५ आलिशान इनोव्हा गाड्या बुक केल्याने या खर्चावरून चर्चा सुरू झाली आहे.

  • Que: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारने प्रशासनाला कोणत्या सूचना दिल्या आहेत?

    Ans: राज्य सरकारने नवीन बांधकामांवर बंदी घालणे, काटकसरीने निधी खर्च करणे, पिण्याचे पाणी व चाऱ्यासाठी निधीची तरतूद करणे, पालकमंत्र्यांवर वाढीव जबाबदारी सोपवणे आणि उपाययोजनांचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • Que: अमरावतीच्या या कार्यक्रमात कोणते उपक्रम आयोजित केले आहेत?

    Ans: या कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ पुरस्कार सोहळ्यासोबतच ‘दुष्काळावर मात’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी १० मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title: Amravati zilla parishad award ceremony 15 luxury innova cars amid drought as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 03:24 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.